खेड I झुंज न्यूज : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांना रिपब्लिक जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली भोसले यांच्या हस्ते पक्षाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक,विचारवंत अर्जुनजी डांगळे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार आळंदी येथे सचिन अहिर यांच्या समवेत पाठिंबा दर्शविण्यात आला.
गेले बारा वर्षे रिपब्लिकन जनशक्ती पक्षाची शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे यांच्याबरोबर युती असून युतीचा धर्म म्हणून महाविकास आघाडीला रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा जिल्ह्याच्या सर्व ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे.
यावेळी पक्षाचे खेड तालुका सचिव शंभु कांबळे, खेड तालुक्याचे कार्याध्यक्ष रमेश बवले, महिला उपाध्यक्ष तिफन्ना काळे, महिला अध्यक्ष रुक्मिणी कांबळे, काजल शिंदे, किरण काळे, ज्ञानबा वाघमारे, युवक आघाडीचे मंजुनाथ कोळी, श्रीमंत भोसले, पेशल काळे, किरण काळे, सुशील कांबळे यांच्या समवेत रिपब्लिकन जनशक्तीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.