पुणे I झुंज न्यूज : कोरोनाच्या काळात हॉटेल व्यवसाय आणि हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प झाला असल्याने बेरोजगारी आणि उपासमार हॉटेल व्यवसायिकांवर ओढली आहे. नुकतेच युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन व व्यापारी महासंघाच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक, डेक्कन येथे सरकारच्या विरोधात घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी रसत्यावर उतरले होते. यावेळी समीर शेट्टी, राहुल रामनाथ, यशराज शेट्टी, अक्षत शेट्टी, जीवनात चावला, रोहन शेट्टी यादी व्यापारी या प्रसंगी उपस्थित होते.
युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग अध्यक्ष यावेळी बोलताना म्हणाले की,
आम्ही करत असलेले घंटानाद व थाळीनाद आंदोलन हे महाराष्ट्र सरकारला घोर झोपेतून जागृत करण्यासाठी आहे. फूड हॉटेल्स रेस्टॉरंट बार परमिट रूम उद्योग गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. आजही आम्हाला संध्याकाळी ४ वाजेसाठी दिलेला वेळ ही योग्य नाही. जगातील प्रत्येकाला माहित आहे की संध्याकाळी ४ वाजता कोणीही चहापान व जेवणासाठी बाहेर येत नाही. संध्याकाळची ४ ची ही वेळ लॉकडाऊन आणि आमच्या उद्योगासाठी संपूर्ण शटडाउन सारखी आहे. आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले.
युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनचे खजिनदार समीर शेट्टी म्हणाले की,
आमच्या सरकारकडे दोन मागण्या आहेत १. रेस्टॉरंट उद्योगाची वेळ संध्याकाळी ४ पासून बदलण्याची आवश्यकता आहे. उत्पादन शुल्कात सवलत हवी आहे आम्हाला एमएसईबी बिल, पाणी कर आणि मालमत्ता करात सवलत हवी आहे, या अगोदर गुजरात, केरळ, कर्नाटकच्या इतर राज्यांनी आधीच सवलत दिलेली आहे आज सरकार खरोखर कसा विचार करत आहे की जेव्हा आम्ही आमचा व्यवसाय दीड वर्षासाठी बंद असतो तेव्हा आम्ही कर आणि फी भरत राहतो. पुढे ते म्हणाले की आम्हाला १२ ते ३ आणि ६ ते ११.३० ही वेळ देण्यात यावी.
_ 📽️एकदा 🤩 बघाच…!_
The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओsss शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!’