हिंजवडी I झुंज न्यूज : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या तळ कोकणातील चिपळूणसाठी सगळीकडून मदतीचा ओघ सुरु असताना, हिंजवडी आयटीपार्क परिसरातील आयटीयन्सकडून सुद्धा मदत रवाना करण्यात आली.
आयटीनगरी परिसरातील मारुंजी आणि जांबे गावाजवळ असणाऱ्या लाईफ रिपब्लिक सोसायटीमधील रहिवाशांनी एकत्र येत संकल्प फॉर ग्रीन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दैनंदिन वापराच्या वस्तू, खाद्यपदार्थ, गरजेची ऊबदार कपडे, सॅनिटारी नॅपकिन, ब्लॅंकेट्स, अगदी झाडू, कोलगेट पासून पाणी बॉटल्स बॉक्स अशा वस्तू चिपळूणकरांना मदत करण्यात आल्या. नुकतेच कोलते पाटील टाऊनशिप मधील आयटीयन्ससह इतर नागरिकांनी एकत्र येत सामाजिक बांधीलकी जपत हि मदत कोकणात पोहच केली.
“संकल्प फॉर ग्रीन संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. गतवर्षीचा पश्चिम महाराष्ट्रातील पूर असो, सध्याची कोरोना परिस्थिती तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात आलेले आसमानी संकट सर्वच ठिकाणी सोसायटी मधील नागरिक मदतीसाठी नेहमी तत्पर असतात असे संस्थेचे संदीप पाल यांनी सांगितले. तर, संकट समयी समाजातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती, राहिवाशी सोसायट्या मधील नागरिक स्वतःहून एकमेकांना मदत करतात हे कौतुकास्पद असल्याचे मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे यांनी सांगितले.
सदर उपक्रमासाठी संस्थेचे संदीप पाल, रामदास येवले, मिलिंद महाडिक, श्रीराम बारसे, सुमित सुरवसे, खंडू गोरे, संजय सिंधे, केदार शहाणे, मुदित तिवारी, अविनाश चौधरी, सौरभ तिवारी, मिलिंद खाजेकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी मारुंजीचे सरपंच कृष्णा बुचडे, हिंजवडीचे पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे, वृक्षमित्र पै. सचिन पवार, ग्रामीण पत्रकार संघ मुळशी ता.अध्यक्ष रोहिदास धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
_”ओsss शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… अराररर खतरनाक 👻… या गाण्याचा नुसता 🔥जाळ अन् धूरर्रर….
_ 📽️एकदा 🤩 बघाच…!_
The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओsss शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!