पिंपळे गुरव I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात आज २२जुलै हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात परंतु सामाजिक आणि विधायक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. शहरातील पिंपळे गुरव येथे माझा प्रभाग माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण तसेच रोपवाटप व मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात आले .
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश ( आप्पा ) जवळकर , राष्ट्रवादी चिंचवड विधानसभा मा.अध्यक्ष शामभाऊ जगताप , युवानेते अमरसिंग आदियाल , अतुल काशीद , युवानेते तानाजीभाऊ जवळकर , पिंपळे गुरख राष्ट्रवादी महिला अध्यक्ष तृप्तीताई जवळकर उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता गणेश जगताप , राज साळुके , बाळासाहेब शेळके , सचिन भांबुरे , दत्ता कदम , किरण शेळके , निलम जवळकर , स्वाती जवळकर , प्रमीला सोनकांबळे व लक्ष्मी सूर्यवंशी यांच्यासह महानगरपालिका अधिकारी गुजर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते .
“पर्यावरणाचा समतोल राहावा आणि हरित पिंपरी चिंचवडचे दादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आम्ही विविध प्रकारच्या जातींच्या झाडांचे वृक्षारोपण केले आहे. या उपक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलांसह तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. असे तानाजी जवळकर यांनी सांगितले.