थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव येथील शासकीय रुग्णालयाचे कै.सौ.अर्चनाताई तानाजी बारणे असे नामकरण करण्यात यावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अजिंक्य दिलीप बारणे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापौर, आयुक्त तसेच ग प्रभाग अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.
अजिंक्य बारणे म्हणाले आहेत कि,
विद्यमान नगरसेविका कै. सौ अर्चनाताई तानाजी बारणे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या सदर प्रभागाच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्याने थेरगाव रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तसेच अत्यंत कमी कालावधी मध्ये व पहिल्याच टर्म ला त्यांनी आपल्या कार्यामुळे चांगलाच नावलौकिक मिळविला होता.
प्रभागात अर्चना बारणे या सर्वात जास्त ऍक्टिव्ह नगरसेविका म्हणून चर्चेत होत्या. प्रभागाच्या विकासासाठी त्यांचा मौलाच वाट आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांनी प्रभागासाठी केलेल्या कार्याची दखल व रुग्णालयासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांचे कार्य लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी थेरगाव रुग्णालयास कै.सौ अर्चना तानाजी बारणे यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अजिंक्य बारणे यांनी केली आहे.