राष्ट्रीय मानव अधिकार प्रदेश प्रतिनिधीपदी धोंडीबा कटके

गराडे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मानव अधिकार एवं भष्ट्राचार निवारण महाराष्ट्र  प्रदेश प्रतिनिधीपदी भिवरी ( ता.पुरंदर ) येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा सिताराम कटके यांची निवड झाली.
निवडीचे पञ  राष्ट्रीय मानव अधिकार प्रदेश अध्यक्ष रमेश गणगे यांनी श्री.कटके यांना दिले. यावेळी राष्ट्रीय कानून मंञी अँड. बाबूराव झेंडे, राज्य उपाध्यक्ष यशवंत कुंभार, युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने, सचिव लक्ष्मण सुरवसे, सरचिटणीस विपुल ठक्कर, ओंकार बोराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मदने, महिला अध्यक्ष भारती कदम आदी उपस्थित होते.
         धोंडीबा कटके हे उद्योजक असून त्यांनी भिवरी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपद व ग्रामपंचायत सदस्यपद कार्यक्षमतेने भूषविले आहे. 
      राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना व राज्याध्यक्ष रमेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब व वंचित घटकांचे प्रश्न, समस्या सोडविणे, भष्ट्राचार निर्मुलन आदी कार्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे निवडप्रसंगी धोंडीबा कटके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *