बिर्ला हाॅस्पीटलला “शिवसेना स्टाईलने” दणका ! ; तब्बल २२ तासानंतर बिल कमी करुन मृतदेह घेतला ताब्यात, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले व मा. नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी केला पोल खोल

चिंचवड | झुंज न्यूज : चिंचवड येथील बिर्ला हाॅस्पीटल मध्ये गेली पंधरा दिवस उपचार घेत असलेले संदिप दत्तात्रय रोकडे वय वर्षे ३५ मुळ राहणार वरूडे, ता शिरूर त्याच्या मागे, पत्नी, मुलगा, मुलगी, चुलती व चुलत भावंडे असा परिवार आहे. दुर्दैवाने आई वडिलांचे या पुर्वीच निधन झाले आहे. परिस्थिती अत्यंत हालाकिची असताना कोरोना संसर्ग झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचारला साथ मिळेना मित्रांनी सहकार्य करून बिर्ला हाॅस्पीटल मध्ये दाखल केले मात्र १८ दिवसांची झुंज अखेर अयशस्वी ठरली संदिपची प्राणज्योत मालवली.

रुग्णालयाने तब्बल ८ लाख रुपये बिल भरा, मग मृतदेह देऊ असा दम भरला. मृताचे मित्रमंडळी हताश झाले २२ तास उलटले अखेर शिवसेनेचा ढाण्या वाघ मा. नगरसेवक धनंजय आल्हाट आणि विद्यमान नगरसेवक व पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले यांना हि बातमी समजल्यावर त्यांनी इतर पदाधिकारी घेऊन बिर्ला कडे धाव घेतली.

भरपुर चर्चा, विनंत्या करुन प्रशासन आडमुठ्या पणा सोडायला तयार होईना अखेर शिवसेना स्टाईलने दणका दिल्यावर रुग्णालय प्रशासन सुता सारखे सरळ झाले आणि दोन पावले मागे घेत, तब्बल ४ लाख रुपये एवढे बिल कमी करुन २२ तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला. 

“यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार करुन रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करणार असुन यापुढे कोणत्याही रूग्णाची छळवणूक वा पिळवणुक रुग्णालयाकडुन होणार नाही. प्रत्येक रुग्णाचे बिलाचे आॅडिट केले जावे अशी मागणी करणार असल्याचे धनंजय आल्हाट यांनी या वेळी सांगितले. तर यावेळी सामान्य माणसावर अत्याचार तिथे प्रहार हिच बाळासाहेब ठाकरे याची शिकवण होती आणि हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखांचे शिवसैनिकच करु शकतात अशि चर्चा उपस्थित नातेवाईकांमधे सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *