नॉर्थ कॅरीलोन I झुंज न्यूज : अमेरिकेतील दोन महिला वैज्ञानिकानी जगात पहिल्यांदा प्रयोगशाळेत आईचे दूध करण्यात यश मिळवलं आहे. या दुधाला बायोमिल्क असे नाव देण्यात आले आहे. बाळाला जन्म दिलेल्या आईचे दूध वेगवेगळ्या कारणामुळे बंद होते. त्यावेळेस नवजात बाळाला दूध मिळत नाही. त्यांच्यासाठी काही ठिकाणी दुधाच्या बँक कार्यरत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी या संशोधनाचं महत्त्व अधिक आहे.
या दुधाला बायोमिल्क असे नाव देण्यात आले आहे. आईच्या दुधा प्रमाणेच या दुधात प्रोटीन, फॅटी ॲसिड व इतर सर्व घटक आहेत. बायोमिल्क तयार करणाऱ्या कंपनीचे मत आहे की, आम्ही बनवलेल्या दुधामध्ये आईच्या दुधा पेक्षा ही अधिक पोषक तत्व आहेत. या कंपनीच्या सहसंस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक, लैला स्ट्रीकलँड यानी सांगितले की, हे संशोधन करणे अतिशय आव्हानात्मक काम होते. तरी ही त्यात आम्हाला यश मिळाल्यामुळे समाधान वाटत आहे.
आईचे दूध तयार करण्याची कल्पना त्यांचीच आहे. त्या स्वतः गरोदर असताना, नऊ महिने पूर्ण होण्याअगोदरच त्यांनी बाळाला जन्म दिला होता. वैद्यकीय अडचणीमुळे त्यांना बाळाला दूध पाजता आले नाही. त्यांच्या शरीरात दूध निर्मिती न झाल्यामुळे बाळ लहान असताना त्याला दूध मिळाले नाही. त्या स्वतः जीव शास्त्रज्ञ आहेत. त्याने २०१३ मध्ये प्रयोगशाळेत पेशी तयार करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर २०१९ मधील आहार शास्त्रज्ञ, मिशेल इगेर यांच्यासोबत भागीदारी केली. त्यानंतर २०२० मध्ये दोघांनी दुधात आढळणारे दोन पदार्थ शर्करा आणि केसिनची निर्मिती केली. त्यानंतर आईचे दूध प्रयोगशाळेत तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसात हे दूध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.