बापरे ! दात घासता घासता चक्क एका पठ्ठयाने गिळला ब्रश आणि नंतर… ; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

“मानवता हाच धर्म” मानत गावकरी शस्त्रक्रियेसाठी सरसावले

शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील मगर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सातकरवाडी येथील नवनाथ सातकर या व्यक्तीची तपासणी केली असता डॉक्टरही चक्रावले. त्या पठ्ठयाच्या पोटात चक्क टूथब्रश असल्याचं पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सातकरवाडी येथील या रुग्णाने दात घासता घासता ब्रश गिळला होता. रुग्णाने ब्रश नेमका का गिळला आणि कसा ? हा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. शेवटी डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

टूथब्रश गिळल्यानंतर रुग्णाच्या पोटात दुखू लागलं होतं. तात्काळ यामुळे त्याला शिरूर येथील मगर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी घेऊन गेले व डॉक्टरांनी सिटीस्कॅन केलं असता त्याच्या पोटात लांबलचक टूथब्रश असल्याचं पहायला मिळाला. पोटात टूथब्रश पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हा ब्रश जवळपास अर्धा फूट लांबीचा होता.

यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम मोठी असल्याने “मानवता हाच धर्म” मानत सातकरवाडीतील सरपंच, उपसरपंच, सातकर परिवार, डफळ, रौंदळ, धायबर, धुमाळ तसेच अनेक गावकरी आर्थिक मदतीसाठी सरसावले. त्यानंतर रुग्णावर यशस्वीपणे शश्त्रक्रिया करुन ब्रश बाहेर काढण्यात आला. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *