रावेतमधील पवनामाईच्या जलपर्णीचा विळखा काढा ; मनसे युवानेते प्रविण माळी यांची मागणी

रावेत I झुंज न्यूज : रावेत मध्ये पवना नदीची वाईट अवस्था झाली आहे. नदीपात्र जलपर्णी ने झाकले गेले असून, जलपर्णी काढून नदीला मूळ रूपात परत आणा अशा आशयाचे निवेदन मनसे युवानेते प्रविण माळी यांनी आरोग्य अधिकारी गेंजे यांना दिले आहे.

 निवेदनात म्हणले आहे कि, शहरे वाढून नद्यांना नाल्याचे स्वरूप आलेले आहे. अशात अनेक ठिकाणाहून रसायन, कचरा मिश्रित पाणी पवना नदीत मिसळून जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मनपाकडून नद्यांच्या संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काहीही कारवाई होत नाही आणि वारंवार पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांना सांगून देखील जलपर्णी काढण्यात येत नाही. नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी पवना सुरू करण्याची आवश्यकता आहे आणि नद्यांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. मनपाने याबाबत पुढाकार घेऊन रावेत मध्ये या मोहिमेचा प्रारंभ करून नद्यांच्या बाबतीत प्रशासन गंभीर आहे याची जाणीव नागरिकांना करून देणे गरजेचे आहे.

जलपर्णी काढल्यानंतर नदीचे पाणी स्वच्छ होऊन त्याचा जनसामान्यांना वापर करता येईल तसेच आजारांना देखील आळा घालता येणे शक्य होईल. तरी सर्व बाबी विचारात घेता लवकरात लवकर कामाला सूरुवात व्हावी अन्यथा प्रशासनास मनसेच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *