रविदादा भिलारे सोशल फाउंडेशन, शिवदर्शन व सन्मित्र महिला बचत गटातर्फे हळदी कुंकू ; थेरगाव परिसरात महिलांचा उत्साह

थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव परिसरात रविदादा भिलारे सोशल फाउंडेशन व शिवदर्शन महिला बचत गट आणि सन्मित्र महिला बचत गट यांच्यावतीने सन्मान आदी शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत परिसरातील महिलामंडळासाठी मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा आयोजित कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमाला महापौर माई ढोरे, अंतरराष्ट्रीय खेळाडू संगीता कोकाटे, नगरसेविका ममता गायकवाड, नगरसेविका झामाबाई बारणे, शिक्षण सभापती मनिषा पवार, रोहिणी बारणे, कावेरी बारणे, विनिता माने, करिश्मा बारणे, शालिनी गुजर, सोनाली गाडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

माई ढोरे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू संगिता कोकाटेंच्या अभिभाषणाने उपस्थितांची मने जिंकली. सदैव महिलावर्गासोबत खंबीर पणे उभे राहुन साथ देण्याची ग्वाही माई ढोरे यांनी दिली. तर झामाबाई बारणे यांनी बचत गटाच्या उणिवा योजनांचे मार्गदर्शन करत ‘ वंचित महिलांनी रविदादा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सरकारी-निम सरकारी योजनांचा लाभ घ्यावा तसेच काही मदत लागल्यास आपण रविदादा सोशल फाऊंडेशन ला वेळोवळी मदत करू’ असे आश्वासन दिले.

भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. जानेवारी महिन्यात संक्रांतीपासून फेब्रुवारी महिन्यातील रथसप्तमीपर्यंत महिला संक्रातींच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात. पूर्वी फक्त घरोघरी चालणारा कार्यक्रम हल्ली सार्वजनिकरीत्याही अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *