थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव परिसरातील प्रामुख्याने वर्दळ असणाऱ्या १६ नंबर बस स्टॉप ते बारणे कॉर्नर व अशोक सोसायटी ते थेरगाव गावठाण या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अजिंक्य बारणे यांच्या पाठपुराव्याने अखेर रस्त्यांची डागडुजी झाली आहे.
“ या भागातील रस्ते वर्षानुवर्षे खडतर झालेले आहेत. प्रशासन वारंवार या विषयांकडे दुर्लक्ष करत होते. पण काही दिवसांपूर्वीच अजिंक्य बारणे यांनी ग प्रभाग कार्यालय येथील अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली तसेच त्वरित रस्त्याची या रस्त्यांची डागडुजी लवकरात लवकर अशी मागणी केली होती.
अजिंक्य बारणे यांनी सांगितले कि, वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा केल्याने अखेर या दोन्ही रस्त्यांचे खड्डे प्रशासनाकडून बुजवण्यात आले असून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.