पिंपरी | झुंज न्यूज : पिंपरीत बायकोला आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील असलेले पैसे हिसकावुन नेले. तसेच दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड करून फरार झाले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पिंपरीतील गिरजुबाबा मंदिरासमोर घडली.
अशिष हनुमंत कांबळे (वय २४ वर्षे रा . मोनिका अपार्टमेंट तिसरा मजला भीमनगरच्या पाठीमागे पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस फिर्याद दिली आहे. विकी प्रधान, रावण ऊर्फ सरफराज शेख व राजा शेख सर्व रा पिंपरी पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .
“ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान फिर्यादी अशिष कांबळे त्यांच्या बायकोला आणण्यासाठी पिंपरीतील गिरजुबाबा मंदिरासमोर आले असता त्यांच्या ओळखीचे तीन आरोपी यांनी गाडी आडविली तेवढ्यात तेथे फिर्यादी अशिष कांबळे याचा मित्र गोपाळ तळेकर तेथे आला असता त्याच्या समोरच आरोपी विकी प्रधान याने आशिष कांबळेची शर्टाची कॉलर पकडुन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली . त्यानंतर आरोपी विकी प्रधान, रावण ऊर्फ सरफराज शेख व राजा शेख यांनी फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशात हात घालून जबरदस्तीने मोबाईल काढुन मोबाईलचे कव्हरमध्ये मागील बाजुस ठेवलेली ५०० रुपयाची नोट काढुन घेतली. तसेच त्यांच्याजवळ असलेला लोखंडी कोयता बाहेर काढुन कोयत्याचा धाक दाखवुन पॅन्टचे खिशातील ५ ९ ० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले.
त्यानंतर या आरोपींनी जवळ असलेल्या चाकुचा धाक दाखवून गाडीची डिक्की जबरदस्तीने उघडण्यास भाग पाडले. यांचा फिर्यादी अशिष कांबळे यांचा मोबाईल हिसकावुन त्यांचा भाऊ अल्पेश यास फोन करुन गिरजुबाबा मंदिरासमोर बोलावून घेतले. तेव्हा भाऊ अल्पेश याचे अंगावर आरोपी हे चाकु मारण्यास गेले असता फिर्यादी अशिष कांबळे यांनी डाव्या हाताने चाकु अडविला त्यामुळे त्यांच्या डावे हाताचे अंगठ्यास चाकु लागुन त्यांच्या अंगठ्याला जखमी करुन ते तिघेही नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी रोडच्या कडेला पार्क केलेल्या अॅटो रिक्षा ( एम.एच.१४.एच.एम .०२८ ९ ,) तीन चाकी टेम्पो नं (एम.एच .१४ ईएम .८५५८) , मोटार सायकल ( एम.एच.१४.ए.पी.९ २१०) या गाड्यांची तोडतोड करुन तेथुन पळुन गेले. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.