१५ दिवसात धनादेश वाटप न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन
पिंपरी I झुंज न्यूज : शासनाकडून घोषित करण्यात आलेली मोबदल्याची रक्कम ही अद्यापही कोरोना संकटात मृत्यू पावलेल्या पिंपरी चिंचवड मनपातील कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना देण्यात आलेली नाही. तरी कोरोना योद्धे म्हणून मत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसदारांना तात्काळ धनादेश वाटप करावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष पुणे युवा जिल्हाध्यक्ष अजिंक्य दिलीप बारणे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हणले आहे कि, धनादेश वाटपात होणारी दिरंगाई श्रेयवादाचे राजकारण कितपत योग्य आहे . कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले होते. असे असतानाही अनुदानाची घोषणा करण्यात आलेली असतानाही अद्याप त्यांच्या वारसदारांना धनादेश मिळालेले नाहीत. हि दुर्दैवी बाब आहे. त्यांना लवकरात लवकर धनादेश मिळावेत हि महापालिकेचीहि जबाबदारी आहे.
“ अजिंक्य बारणे म्हणाले कि, या संदर्भात अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना विषयाच्या गंभीरतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच लवकरात लवकर मोबदल्याची रक्कम मृत्युमुखी पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना १५ दिवसात मंजूर करून न दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल.