पिंपरी | झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरीकांना (विशेषत: रेडझोनमधील) शास्तीकर भरणेबाबत मिळकत जप्तीच्या नोटीसा पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील आर्थिक अडचणीत असलेले सर्व सामान्य नागरीक चिंताग्रस्त आहेत. म्हणून शास्तीकर वगळून सामान्य कर वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिका आयुक्त यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
“ पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाविकास आघाडी सरकारला विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री-अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांचा शास्तीकर वगळून केवळ मुळ मिळकत कर भरून घेणेबाबत, असे आदेश व्हावेत व नागरीकांना दिलासा द्यावा, म्हणून विनंती केली होती.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून मा. आयुक्त, पिं.चिं.मनपा यांना नागरीकांकडून शास्तीकर वगळून मुळ मिळकत कराचा भरणा स्विकृत करण्याच्या प्रस्तावास दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.