- आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल संघटनेच्यावतीने कौतुक
- पारधी समाजातील मुलींनी पोर्णिमाचा आदर्श घ्यावा – माऊली भोसले
पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या पौर्णिमा अंजूस शिंदे यांचा सत्कार आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने नुकताच करण्यात आला. यावेळी पारधी समाजातील मुलींना पोर्णिमाचा आदर्श घेऊन विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करावे पोर्णिमाच्या जिद्दीला व कष्टाला सलाम असे मत संघटनेचे अध्यक्ष किसन माऊली भोसले यांनी व्यक्त केले.
पोर्णिमा शिंदे यांची निवड मुंबई येथे झाली. व संघटनेच्या वतीने आदिवासी पारधी समाजातील क्रांतिकारी समशेर सिंह भोसले यांच्या 1858 मध्ये इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाबद्दल व कार्याबद्दल माहिती नमूद असलेले प्रतिमा देऊन पोर्णिमा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष माऊली भोसले, सार्जन पवार, रमेश बवले, योगेश पवार, सतीश भोसले, नरेंद्र शिंदे, अंजूस मामा शिंदे, शानू भोसले यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी या झालेल्या निवडीचा समाजामध्ये समाधानकारक व अभिमानास्पद वातावरण दिसून आले.