सरपंच कमल शिवले यांची चौकशीची मागणी
शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील पारोडी ग्रामपंचायतीत ठरविण्यात आलेल्या वेळेच्या आधीच ध्वजारोहण करण्यात आल्याने सरपंच कमल शिवले यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनात म्हणले आहे कि, ग्रामपंचाय पारोडीयेथील ग्रामपंचायतीचे नमूद वेळेपूर्वी १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नियोजनाप्रमाणे सकाळी ८ वा. १५ मिनिटांनी ध्वजारोहण करण्याचे ठरले होते. मात्र हे ध्वजारोहण ठरलेल्या वेळे आधीच ७ वा ५५ मिनिटांनी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले आहे.
हा ध्वजारोहण कार्यक्रम ठरलेल्या वेळेपूर्वी कसा काय झाला आणि कुणाच्या आदेशाने झाला याची खातर जमा करावी अशी मागणी सरपंच कमल शिवले यांनी केली आहे.