१५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु करण्यास केंद्र सरकारची परवानगी ; नियमावली जाहिर

मुंबई | झुंज न्यूज : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक पाचमध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. अशातच केंद्र सरकारच्या वतीने आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या लागू केल्यापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ ५० टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज १५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली पुढीलप्रमाणे

चित्रपटगृहात केवळ ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक. चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे. आसनव्यवस्था राखीव ठेवू नये. प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावं. आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा. थर्मल स्क्रिनिंग करावी, केवळ लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाचा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *