देहूरोड कँटोन्मेंटच्या कच-याबाबत उपापयोजना करा – संजोग वाघेरे पाटील

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व देहूरोड कँटोन्मेंट प्रशासनाला पत्र

पिंपरी I झुंज न्यूज : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा निगडी भक्ती-शक्ती चौकापासून जवळच टाकला जातो. तेथून निघणाऱ्या दुर्गंधी व धुरामुळे नगारिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या संदर्भात गांभीर्याने विचार करून कचरा समस्येवर उपापयोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका व देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड यांना संजोग वाघेरे पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून जवळ असलेल्या लष्कराच्या माळरानावर टाकलो जातो. तेथे कचरा पेटल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तेथे निघणाऱ्या दुर्गंधी व धुरामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर आणि निगडी णातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परिसरात प्रचंड मोठा जनसमुदाय वास्तव्यास आहे. कचऱ्याच्या अशुद्ध हवेमुळे परिसरातील स्वच्छ हवा प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा सर्वात जास्त त्रास लहान मुलं, वृद्धांना होत असून, श्वसनाची गंभीर समस्या उद्भवत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक केंद्रही आहेत. त्यांनाही या समस्येचा त्रास होत आहे. कारणामुळे बहुतांशी आस्थापनांनी या परिसरातून काढता पाय घेतला आहे. ती चाकण औद्योगिक परिसरात स्थलांतरीत झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नावरही त्याचा परिणाम झाला आहे.नागरिक सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत”.

…अन्यथा प्रशासनाविरुध्द जनांदोलनाचा इशारा

या कचरा समस्येबाबत महानगरपालिका व कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासन कोणताही ठोस उपाययोजना अंवलंबविल्या जात नाहीत. नागरिकांच्या आरोग्यासाठी, तसेच शहराच्या हितासाठी दोन्ही प्रशासनाने संयुक्तपणे या बाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. नागरिकांची या समस्येपासून सुटका करावी, अन्यथा परिसरातील नागरिकांसह प्रशासनाविरुध्द जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा या निवेदनाव्दारे संजोग वाघेरे पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *