खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत
पिंपरी I झुंज न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच ठाकरे गटाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळ्याच्या उपशहरप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
लोणावळा उपशहरप्रमुख संजय भोईर, मनिषा भांगरे, पिंपरी-चिंचवडच्या महिला उपजिल्हाप्रमुख स्वरुपा खापेकर, व्यापारी असोसिएशनचे अॅड. कमलेश मुथा, पांडुरंग भाडेकर, मीना मांडे, संगीता आमटे, स्नेहल साळुंखे, काळोखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांचे विकासाचे व्हिजन, दृरदष्टी, त्यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. त्यांना सन्मान दिला जाईल. सर्वांनी निवडणुकीच्या कामाला लागावे.