प्रथम लोकनियुक्त आमदार अश्विनी जगताप यांचा अपमान हा भाजपच्या मनुवादी मानसिकतेचे प्रतीक..

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांच्याकडून घटनेचा निषेध

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहराचे सर्वेसर्वा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी चिंचवड विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार अश्विनीताई जगताप यांचा भाजपामध्ये होत असलेला अपमान हा भाजपच्या मनुवादी महिला विरोधी मानसिकतेचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( शरद पवार गट ) महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनी केले.

चिंचवड विधानसभेचे आमदार अश्विनी जगताप यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अपमानास्पद वागणूक देण्यात आले त्यांना आमदार असूनही कोपऱ्यात बसविण्यात आले त्यामुळे त्यांनी भाजपच्या सरचिटणीस यांना त्याबाबत झापले त्यांना वेळोवेळी डावले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली त्यामुळे आम्ही या अपमानाचा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून प्रथम जाहीर निषेध करित आहे असे ज्योती निबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

भाजपा हा आरएसएस च्या मनुवादी विचारांचा पक्ष आहे त्यांनी महिलांना विरोधच केलेला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यावेळीही याच मानसिकतेच्या लोकांनी त्यांना विरोधच केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेच्या अधिकारासाठी हिंदू कोड बिल आणले त्यावेळी याच मानसिकतेने त्यांचाही विरोध केला भाजप हे सदैव महिला विरोधी विचारांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे.

“भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेरित असा पक्ष आहे तेथे महिलांना सदैव कमी लेखले जाते. महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय पवार साहेब यांनी महाराष्ट्र मध्ये प्रथम 33% महिलांना आरक्षण देऊ केले त्याचाच एक भाग म्हणून आज अश्विनीताई जगताप या आमदार झालेले आहेत आणि आज त्यांचा अपमान या पक्षात होत आहे हा कधीही एक महिला म्हणून आम्ही सहन नाही. येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महिलाच भारतीय जनता पार्टीला जागा दाखवून देतीलच. असे प्रतिपादन महिला अध्यक्षा ज्योती सचिन निंबाळकर यांनी केले…

             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *