पिंपरी I झुंज न्यूज : शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या हस्ते गणेश आहेर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
दोन दिवसापूर्वी भाजपच्या घर चलो आभियाना दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेत जावुन देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न करत जनतेचे मत जाणुन घेत असताना शगुन चौकात त्यांनी गणेश आहेर यांना देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारला. यावर गणेश आहेर यांनी देशाची भावी पंतप्रधान उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दिल्यांने क्षणभर बावनकुळे गोंधळलेल्या अवस्थे मध्ये दिसुन आले व त्यांनी पुन्हा प्रश्न केला कि उध्दव ठाकरे का… तर गणेश आहेर यांनी उत्तर देतांना म्हटले कि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच या देशासाठी फार मोठे योगदान आहे त्यांचे सुपुञ म्हणुन पंतप्रधान उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच झाले पाहिजे असे म्हणत बावनकुळे यांची बोलती बंद केल्यांनी शहरभर याची चर्चा रंगतांना दिसुन येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या हस्ते गणेश आहेर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेची संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, योगेश बाबर, अनिता तुतारे, रोमी संधु, हाजी दस्तगिर मणियार, आनंत कोऱ्हाळे, तुषार नवले, संतोष वाळके, अमोल निकम, गुलाब गरुड उपस्थित होते.