माॅडर्न महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न…

पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील पी ई सोसायटीच्या माॅडर्न महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा पी ई सोसायटी शिवाजीनगर येथे सभागृहात पार पडला. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डाॅ पराग कालकर, श्री मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधिक्षक, ग्रामीण विभाग व शिवछत्रपती पदक विजेते श्री पवनराज पाटिल, प्रा शामकांत देशमुख, कार्यवाह, पी ई सोसायटी , प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी, डाॅ प्रकाश दिक्षित उपकार्यवाह, प्राचार्य डाॅ संजय खरात यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

या प्रसंगी प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले,” संस्था मोठ्या होतात कारण विद्यार्थी मोठे होतात. आमच्या महाविद्यालय मोठे होण्यात पालक, विद्यार्थी व शिक्षक यांचा मोठा सहभाग आहे.”

श्री पवनराज पाटील, माजी विद्यार्थी व शिवछत्रपती विजेते म्हणाले,” खेळाडूंना कायम महाविद्यालयाने मान सन्मान दिला आहे. प्रोत्साहन दिले म्हणून आम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आम्ही मिळवु शकलो. यासाठी मी सगळ्यांचे एकत्रीत आभार मानतो.”

श्री मितेश घट्टे यांनी विद्यार्थ्यांना तीन शब्द तृष्णा, सामर्थ व सर्वोत्तमता लक्षात ठेवा असे सांगितले. सर्वोत्तम बनण्यासाठी प्रचंड जिद्द ठेवा आणि अविरत परिश्रम करा असे सांगितले.

प्रा शामकांत देशमुख प्रोत्साहन पर म्हणाले कौशल्ये आत्मसात करण्यासाठी विविध उपक्रमात सहभागी व्हा. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार मिळेल. यशस्वी होण्यासाठी त्याची गरज आहे.

डाॅ पराग कालकर, प्र कुलगुरू म्हणाले, पालकांनी आपली आवड विद्यार्थांवर लादणे योग्य नाही. विदयार्थ्यांचे पालक बना मालक नको.त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करुन द्या.यासाठी सगळ्यांचे सहकार्य लाभेल

या प्रसंगी प्रेरणा पुरस्कार कै ज्योती मुंगसे माजी विद्यार्थी, यांच्या स्मरणार्थ राजेश पुंगाटी याला देण्यात आला. फेलसेफ या एकांकिके साठी पुरूषोत्तम मिळविणाऱ्या शिरीश कुलकर्णी लेखन, श्रिरंग वैद्य- दिग्दर्शन व अभिनय उत्तेजनार्थ व टिमला जयराम हार्डिकर करंडकासाठी पारितोषिक देण्यात आले. आभ्यास,कला,खेळ,संशोधन अशा अनेक विषयात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थांना आज पारितोषिके देण्यात आली. सर्वोकृष्ट विद्यार्थी, प्राईड आँफ माॅडर्न हे विशेष पारितोषिक ज्वलंती सुंदरम, मायक्रोबायलाॅजी हिला देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन डाॅ ज्योति गगनग्रास, उपप्राचार्य, कला शाखा यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा सोनल कुलकर्णी, बक्षिसांचे वाचन डाॅ प्रियांका भामरे, डाॅ केतकी सरवटे, डाॅ दिपक शेंडकर यांनी केले तर डाॅ मेघा देशपांडे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वय डाॅ माधुरी कुलकर्णी, विभाग प्रमुख, रसायन शास्र यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पी ई सोसायटीचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन एकबोटे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *