पिंपरी I झुंज न्यूज : कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी योगेश बाळासाहेब काकडे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे यांनी त्यांची निवड जाहीर केली.
काकडे हे पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली येथील भुमीपुत्र असून, त्यांनी आजपर्यंत शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. त्यांचे आजपर्यंत कुस्ती क्षेत्रातील योगदान आणि आवड लक्षात घेऊन महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप भरणे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
“पिंपरी चिंचवड शहरात मल्लविद्या महासंघाचे काम अधिक गतिमान करून राष्ट्रीय स्तरावरील मल्ल घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे योगेश काकडे यांनी सांगितले.”