फी कपात न झाल्यास पक्षाकडून आंदोलनाचा इशारा
पिंपरी I झुंज न्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सहानभूती न दाखविता शाळा आणि महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्षाच्या फि साठी पालकांकडे तगादा लावलेला आहे. मात्र लॉकडाऊन मुळे अनेक पालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे चालू वर्षाची शैक्षणिक फी ५० टक्के कपात करण्यात यावी. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अजिंक्य बारणे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
“निवेदनात म्हणले आहे कि, सध्या जागतिक आपत्ती सुरु आहे कोरोनाने थैमान घातले आहे. अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवहार ठप्प झाले तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लोकांना जगणेही असह्य झाले आहे. अशा परिस्थितीत शाळा पालकांकडून फि साठी तगादाच नव्हे तर धमकीवजा मॅसेज पाठवून मानसिक त्रास देत असून लूट करीत आहेत.”
नोकरी करणाऱ्या पालकांचे वेतन ३० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहे तर स्वयंरोजगार असणाऱ्या पालकांना मागील दोन – तीन महिन्यात फुटक्या कवडीचेही उत्त्पन्न झालेले नाही. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालयांची फी भरणे पालकांना शक्य होणार नाही. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष २०२० – २१ च्या फि मध्ये ५० टक्के कपात करून पालकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास निवेदनात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.