वाकड I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नैसर्गिक नाले, पक्के नाले, ओढे, यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी शहर अभियंता तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य समन्वयक अधिकारी श्री प्रमोद ओंभासे यांच्याकडे जनसंवाद सभेत केली आहे.लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, म्हणून ही कामे आधीच करण्याची मागणी केली आहे.
शहरातील नालेसफाई वेळेवर झाल्यास पावसाळ्यात नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. नाले आणि ओढे सफाईचे काम वेळेवर सुरू केल्यास पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकेल. म्हणून जनसंवाद सभेत अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरात नदी, नाले, ओढे, असून त्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे. ओढे आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने ते प्रवाह अडविले जातात आणि पाणी इतरत्र पसरले जाते. तसेच मुंबई बेंगलोर महामार्गावरील विविध पुलांच्या खाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्याचाही बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
या व अशा अन्य समस्यां सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी जनसंवाद सभेत केली आहे.