नवी मुंबई I झुंज न्यूज : नाटककार, कादंबरीकार, कवी आणि जाणीव प्रकाशनचे प्रकाशक श्री. मोहन भोईर यांनी विविध साहित्य प्रकारांच्या पुस्तकांना पत्रकार परिषदेत पुरस्कार जाहीर केले.
दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी योगविद्या, सेक्टर९, वाशी येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. जाणीव प्रकाशन, कोकण मराठी साहित्य परिषद, गरी विकास साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार श्री. ए. के. शेख असणार आहेत. अभिनेते विशाल पाटील, भगवान ठाकूर, जयेंद्र दादा खुणे, श्रीकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित असतील. कवी पुंडलिक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महाकवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री सौ. दमयंती भोईर या करतील.
पुरस्कार्थी
१.सर्वोत्कृष्ट कादंबरी साठी कै. नासिकेत राघो भोईर स्मृती पुरस्कार-
बाजार-चंद्रकांत मढवी, पनवेल
रांघ्या-अनंत पाटील, उर्णोली, पेण
२.सर्वोत्कृष्ट काव्य संग्रह- कै.दिनानाथ सुतार स्मृती पुरस्कार-अस्वस्थ वर्तमानातील मी-बाबू फिलीप डिसोजा, निगडी, पुणे
३.सर्वोत्कृष्ट कथासंग्रह-कै.यमुनाई भोईर स्मृती पुरस्कार-एक झुंज-माधुरी वैद्य डिसोजा (कुमठेकर)
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
४.सर्वोत्कृष्ट नाटक-कै.जयराम पाटील पुरस्कार
ऋणानुबंध-मानसी मराठे, महाड
५.सर्वोत्कृष्ट ललित संग्रह स्व. सुनंदा मोडखरकर स्मृती पुरस्कार
हॅलो रायगड-अरविंद पाटील जुहू गाव, कोलाड
६.सर्वोत्कृष्ट संकीर्ण-कै.गोपीनाथ मोकल स्मृती पुरस्कार-स्वामी समर्थ चमत्कार गाथा-प्रकाश राजोपाध्ये, खोपोली
७.सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह-कै.मोतीराम यशवंत पाटील स्मृती पुरस्कार-माझ्या जगण्याचं बळ-जितेंद्र लाड, नवी मुंबई
८.सर्वोत्कृष्ट प्रबोधनात्मक-कै.शिवरामबुवा भोईर स्मृती पुरस्कार-भेजा फ्राय-अनिल पिसे
९.सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी-कै.मंदाताई भोईर स्मृती पुरस्कार-नरवीर तानाजी मालुसरे-डॉ.शीतल मालुसरे
१०.सर्वोत्कृष्ट जाणीव सामाजिक पुरस्कार-जनार्दन सोनखरकर, पेण