थेरगाव I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या व माध्यमिक विद्यालय थेरगावच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या कबड्डी खेळाडूंना श्रीमती सुप्रियाताई बडवे संचालिका स्पोर्ट्स इंडी फेसबुक चॅनल व व्यवस्थापिका बडवे आणि बडवे इंडस्ट्रीज यांचे शुभ हस्ते व श्री बन्सी आटवे यांचे सौजन्याने स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात सदर खेळाडूंना त्यांच्या कंपनीमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन नोकरी देण्याचे आश्वासन दिले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंनी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन श्री दत्तात्रेय झिंजुर्डे आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच यांचे शुभहस्ते करण्यात आले.
दरम्यान अनिल लोहार एपीआय वाकड पोलीस स्टेशन यांचे ‘”स्पोर्ट्स आणि करिअर” या विषयावरील खेळाडूंना व्यावसायिक मार्गदर्शन करणारे व्याख्यान झाले. “आपल्याकडे असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय प्रमाणपत्रांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून शासकीय नोकरीच्या रूपाने कॅश करावे!'”असा खेळाडूंना त्यांनी सल्ला दिला.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच तथा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाहक दत्तात्रय झिंजुर्डे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब तांबे, मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड माध्यमिक विद्यालय थेरगाव, उपशिक्षक माध्यमिक विद्यालय थेरगाव कृष्ण कांत टकले, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सोनाली जाधव, संतोष बारणे, कुस्ती प्रशिक्षक महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन कालिदास लांडगे, आयेशा मत्तिको, श्रीपाद जवळेकर, मंदार दीक्षित, मेघा खराडे, अभिजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश इंगळे यांनी केले.