थेरगाव । झुंज न्यूज : सामाजिक बांधिलकी जपत मनविसे शहराध्यक्ष अनिकेत प्रभू यांच्या वतीने डांगेचौक येथील जनसंपर्क कार्यालयात गेल्या २ आठवड्यापासुन विशेष आधार कार्ड अपडेट शिबीर मोठ्या उत्साहात सुरु आहे.
ज्या व्यक्तींनी १० वर्षा पूर्वी आधार काढलेले आहे म्हणजे अगदीच सुरवातीला जेव्हा आधार नोंदणी सुरू झाली तेव्हा, अशा सर्वांना आधार E-KYC करणे गरजेचे आहे. अश्या व्यक्तींनी आपल्या नावाचा व पत्याचा पुरावा घेऊन आधार update करायचे आहे, अन्यथा आपले आधार inactive करण्यात येणार आहे . अशा सूचना सरकार कडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा सर्व नागरिकांसाठी विशेष आधार कार्ड अपडेट शिबीर अनिकेत प्रभु यांनी राबविले आहे.
गेल्या २ आठवड्यात अनेक ज्येष्ठ नागरीकांनी, महीलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन आपले कागदपत्रे उपडेट करुन घेतली. सर्वाना आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे तरी सर्व नागरीकांनी लवकरात लवकर आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्या हा संदेश थेरगावात सर्वाना देऊन हे शिबीर यशस्वी करण्यात आले. यामधे आतापर्यत ५००-६०० नागरीकांना आपले आधार अपडेट करुन घेतले.
विशेष आधार कार्ड अपडेट शिबीर आपल्या दारी घराजवळ आल्यामुळे नागरीकांनी आनंद व्यक्त केला व भविष्यात ही अशा प्रकारचे शिबीर आयोजित करण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरीकांनी केले. यामुळे वेळेची बचत झाली व कामही लगेच झाले ही भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या शिबीरासाठी अनिकेत प्रभु मित्र परीवार तसेच अमोल शिंदे , शेखर गांगर्डे,श् रीकांत धावारे, यश कुदळे, स्वप्निल मंडल, गणेश डांगे, शंतनु तेलंग, आकाश पांचाळ यांनी नियोजन केले.