शिरूर I झुंज न्यूज : हवेली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख स्व.राजेश सोनवणे यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना शहर शिवसेना युवासेना यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मा. सुनीलदादा जाधव, (शिवसेना मा.शहर प्रमुख, शिरूर), स्वप्नीलआण्णा रेड्डी (शिवसेना युवासेना शहर अधिकारी), शिरूर, अविनाश घोगरे (शिवसेना युवा नेते, शिरूर), सुनील जठार (जेष्ठ शिवसैनिक), रंजनभैय्या झांबरे (राष्ट्रवादीचे युवा नेते), राहूल मोहळकर (शिवसेना युवासेना तालुका सरचिटणीस), सिद्धांत चव्हाण (शिवसेना युवासेना संघटक शहर), महेंद्र येवले (शिवसैनिक) यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.