शिरूर I झुंज न्यूज : कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून आज अनोख्या पद्धतीने कीर्तन संपन्न झाले. असल्याचे विद्याधाम मध्ये टाळमृदुंगाचा गजर झाला आहे.
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह.भ.प. विश्वास महाराज गाडगे यांचे कीर्तन आयोजित केले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, संचालक शहाजी दळवी, प्राचार्य अनिल शिंदे, पर्यवेक्षक साहेबराव आंधळे यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. दरम्यान कीर्तनकार विश्वास महाराज गाडगे यांनी कीर्तनातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा आढावा घेतला. सर्व संतजनांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.