प्रसिद्ध कवी प्रा. अनंत राऊत व प्रसिद्ध लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांची प्रमुख उपस्थिती
पिंपरी | झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद तसेच मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 20 जानेवारी रोजी पत्रकार काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी दिली.
यावेळी शब्दरत्न पत्रकार स्व. भालचंद्र मगदूम कविरत्न पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध कवी प्रा. अनंत राऊत, प्रसिद्ध लेखक डॉ. प्रकाश कोयाडे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रीडा सेलच्या अध्यक्षा समिता गोरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या काव्यमैफलीत गोविंद वाकडे, पितांबर लोहार, दीपेश सुराणा, अमोल काकडे, भूषण नांदुरकर, संजय बेंडे, अश्विनी सुमित भोगाडे, अमृता कोंबाळे, ज्ञानेश्वर भंडारे, प्रशांत चव्हाण, महादेव वाघमारे, अविनाश आदक, राजू वारभुवन, माधुरी कोराड आदी कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
सदरची काव्य मैफल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी मुंबई पुणे रस्ता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येथे सकाळी ११ वाजता होणार आहे अशी माहिती ही पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी दिली.