पिंपरी I झुंज न्यूज : कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड पुणे शहर यांच्या माध्यमातून युवाशक्ती संस्थेच्या २०२३ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
युवाशक्ती ही संस्था कोकणातील खेड तालुक्यातील पिंपरी-चिंचवड, पुण्यामधील वास्तव्यास असलेल्या युवकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून मागील पाच-सहा वर्षांपासून काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कोकण ही जन्मभूमी समजून व पुणे ही कर्मभूमी समजून वेळोवेळी समाज उपयोगी कामे करण्यात आली आहेत.
या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कॅप्टन श्रीपत कदम व राम उतेकर साहेब व संस्थेचे अध्यक्ष सुरज उतेकर व सर्व कार्यकारणी सदस्य व सभासद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी युवाशक्ती वाढीसाठी आणि वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक संदीप कदम सर व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप सकपाळ सर यांनी केले.