(प्रतिनिधी : सुरंजन काळे)
आंबेगाव I झुंज न्यूज : आंबेगाव तालुक्यात २१ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर १५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून, या निकालात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पक्षाने बाजी मारल्याचे पाहावयास मिळाले.
आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पुरस्कृत १६ सरपंच, २ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे, १ ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंच निवडून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गटाने चिखली, तळेघर, आहुपे, डिंभे खुर्द, नागापूर, रांजणी, घोडेगाव,आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चांडोली, पारगावतर्फे खेड, मेंगडेवाडी, नारोडी, निघोटवाडी या १५ ग्रामपंचायती आल्याचा दावा केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने साल व कळंब या दोन ग्रामपंचायतींवर, तर धामणी ग्रामपंचायतीवर गावकरी विकास पॅनल पुरस्कृत सरपंच निवडला गेला आहे, तर गोहे खुर्द येथील सरपंच अपक्ष असल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामपंचायतींचे नाव व सरपंच यांची नावे पुढीलप्रमाणे आहुपे : ग्रामपंचायतीत शोभा प्रकाश असवले, आंबेदरा- वृषाली दिनेश वाजे, आमोंडी- आरती ज्ञानदेव कोतवाल, भावडी- कातळे कमल पंडित, चांडोली बु.- दत्तात्रय सोमा केदार, चिखली- जयरामगंगाराम जोशी, चिंचोडी- संगीता प्रदीप शेवाळे, धामणी- रेश्मा अजित बोऱ्हाडे, डिंभे खुर्द- शिला राजेंद्र लोहकरे, गंगापूर खुर्द- कविता भरत सातकर, घोडेगाव- अश्विनी विक्रम तिटकारे, गोहे खुर्द अश्विनी नामदेव शिंगाडे, कळंब- उषा सचिन कानडे, मेंगडेवाडी- बाळासाहेब सावळेराव मेंगडे, नागापूर- गणेश अर्जुन यादव, नारोडी – मंगल नवनाथ हुले, निघोटवाडी- नवनाथ बबन निघोट, पारगाव तर्फे खेड- नंदा सचिन पानसरे, रांजणी – छाया बंडू वाघ, साल- प्रवीण महादेव साबळे, तळेघर – कविता नारायण इष्टे या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यांना विजयी घोषित केले आहे.