शिरूर : निमगाव म्हाळुंगी येथील सलग २५ वर्ष आदर्श माजी सरपंच व श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ सचिव व संस्थापक रामचंद्र गेनुजी काळे (मामा) वय वर्ष ९० यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मामांच्या जाण्याने संपूर्ण निमगाव म्हाळुंगी व समस्त काळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अतिशय शांत, संयमी, अबोल व वाचनाचा प्रचंड व्यासंग असणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. ही सर्वांसाठी अतिशय दुःखद अशी घटना आहे. एकच ध्यास गावचा विकास या न्यायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी गावचे नेतृत्व केले, गोरगरिबांना न्याय मिळवून दिला.
“शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये अतिशय मोलाची भूमिका पार पाडणारे, शिक्षण व्यवस्थेच्या कामकाजात सदैव अग्रणी राहून एक वेगळा आदर्श निर्माण केला. व शिक्षण संस्थेच्या सचिव पदाचीही धुरा अतिशय खंबीरपणे सांभाळली, व शिक्षण संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर केले होते.”