थेरगाव : गुजरनगर येथील उद्यान परिवारचे आणि महादेव काॅलनी मित्र मंडळाचे सदस्य आनिल कूमठेकर (वय वर्ष ६५ ) यांचे नुकतेच निधन झाले. कायम हसतमुख स्वभावामुळे त्यांचे परिसरात सर्वांशी चांगले संबंध होते.
कुमठेकर हे अतिशय हसरे व गोड व्यक्तीमत्व होते. कॉलनीच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.