पिंपरी : लॉकडाऊन मधील वाढीव वीज बिल कमी करण्यात यावी आशी मागणी लहूजी शक्ती सेना व मातोश्री सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
लहूजी शक्ती सेना शहरप्रमूख राजू आवळे आणि मातोश्री सामाजिक संस्था संस्थापक गणेश आहेर यांनी नागरिकांच्या वतीने हे निवेदन दिले. एम सी बी ऑफिसने वीज बिल कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे मागणी या पञाव्दारे करण्यात आली आहे.
कोरोना’ सारख्या वैश्विक संकटकाळात अनेकांचे उद्योग, व्यापार जवळपास बंदच असून त्याचे विपरीत परिणाम वैयक्तिक अर्थकारणावर देखील दिसून येत आहेत. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. असे असतानाही महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ तसेच इतर वीज कंपन्या कोरोना काळात वीज बिलांची अवाढव्य आकारणी करीत आहेत.
वीज बिला संदर्भात नागरिकांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकडाऊन मधील वाढते वीज बिल कमी करणे गरजेचे आहे. तसेच एम सी बी ऑफिस मधून ग्रहाकांना मिळणारी अयोग्य वागणूक देखील सूधारण्यात यावी. अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.