सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून, कृतीशील कार्याने मराठा सेवा संघाचा ३० वा वर्धापन दिवस साजरा

पुणे : सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून, कृतीशील कार्याने मराठा सेवा संघाचा ३० वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वैचारिक प्रेरणेतून राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनची स्थापना झाली. मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिना निमित्ताने ज्यांनी सेवा संघाच्या विचारांना वाहून घेतले अशा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या जेष्ठ पदाधिकारिकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.

यावेळी विकास आण्णा पासलकर, मारुतीराव सातपुते, रमेश गुजर, संतोष शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, अनिल माने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी ऋतुजा गुजर या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती योजनेचा धनादेश देण्यात आला. ऋतुजाच्या वडिलांची रिक्षा लॉक डाऊन मध्ये हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने ओढून नेली. या विद्यार्थिनीचा संघर्ष व शिक्षणाची जिद्द बघून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश निरीक्षक विकास आण्णा पासलकर यांनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिच्या संपूर्ण शिक्षणकाची जबाबदारी स्वीकारली.

“ऋतुजा स्वतः पुण्यातील विश्रांतवाडी भागात चहाच्या टपरीवर आपल्या आईसोबत काम करून बारावी सायन्स परीक्षा ८४ % मार्कांनी उत्तीर्ण झाली. मेरिटच्या बेसवर फर्ग्युसन महाविद्यालयात BSC साठी प्रवेश मिळाला, परंतु ऍडमिशन साठी पैसे नसल्याने प्रवेश रखडला. या विद्यार्थिनीला आज राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजनेचा धनादेश सुपूर्त केला.”

क्षणात संपणारा स्फोट नको आता,
मनात घोळणारी ताण हवी !!
निमिषात निमणारी आग नको आता,
तानाम तेवणारी ज्योत हवी !!
“एक पाऊल कृतिशीलते कडे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *