दातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भिवडी येथील वांढेकर कुटुंबीय

बंधूच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळून विद्यालयाला केली १२५००० रुपयांची मदत

गराडे : दातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भिवडी (ता.पुरंदर) येथील वांढेकर कुटुंबीय अशी जण सामन्यात ओळख वांढेकर कुटुंबीयांची झाली आहे. कुटुंबातील शामराव अनंतराव वांढेकर यांचे दि. १७ आँगस्ट रोजी निधन झाले होते. वांढेकर कुटुंबीयांनी कै.शामराव वांढेकर यांच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळून भिवडी येथील हुतात्मा उमाजीराजे माध्यमिक विद्यालयाला १२५००० रुपयांची मदत केली. अशी माहिती मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे यांनी दिली आहे.

यामध्ये ५० इंची एल.इ.डी. टीव्ही संच, १ प्रोजेक्टर व २५००० रु धनादेश १२५००० रुपयांची मदत भिवडी येथील हुतात्मा ऊमाजी नाईक विद्यालयाला करुन एक नवीन पायंडा पाडला. या मदतीबद्दल डॉ.लक्ष्मण अनंतराव वांढेकर, श्रीमती कांताबाई विलासराव भोसले (वांढेकर) मोहन वांढेकर, दादासाहेब वांढेकर व सर्व वांढेकर कुटुंबियांचे आभार संस्थेचे अध्यक्ष शामकांत भिंताडे यांनी मानले आहेत.

“यापुर्वी वांढेकर कुटुंबियांनी विद्यालयाला २००५ मध्ये २ संगणक, सन २००९ मध्ये ५०००० रुपयांच्या खुर्च्या, सन २०१० मध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी व विद्यार्थ्यांना खाण्यासाठी ५५००० रुपयांची भांडी, सन २०१५ मध्ये आईचा दशक्रिया विधीचा खर्च टाळून ५१००० रुपये प्रयोगशाळा बांधकामासाठी मदत, २०१६ मध्ये टेक्नीकल विभागासाठी फ्रिज, सन २०१८ मध्ये विद्यालयाच्या रौप्य महोत्सवासाठी ३०००० रुपयांची मदत, दरवर्षी विद्यालयातील ३ गरीब मुलींचा शैक्षणिक खर्च आदी मदत केलेली आहे. त्यामुळे वांढेकर कुटुंबाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *