थेरगाव : कोरोनाच्या विघ्नाशी झुंज देत असताना महापालिकेतर्फे विसर्जन घाटावर गणपती विसर्जन करण्यास बंदी केली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी नागरिकांची दगदग होऊ नये यासाठी वनदेव आनंदवन मित्र मंडळातर्फे विसर्जन रथ तयार करण्यात आला असून गणेश विसर्जन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये फिरते हौद-पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात अली आहे.
नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष आकाश बारणे, सनी बारणे, सिद्धेश अवसरे व आशिष शेळके हे सदस्य हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे आहे त्यांनी एक दिवस आधी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात येत आहे. यामध्ये फिरते वाहन संबंधित व्यक्तीच्या घराजवळ जाऊन तिथेच विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“कोरोना महामारीमुळे यंदा बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने आली आहेत. तसेच सार्वजिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणपती मूर्तींचे विसर्जन नदी घाटावर न करता कृत्रिम तलावांमध्ये करण्याला भाविकांनीहि अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे हा ‘विसर्जन रथ’बाप्पाच्या भक्तांना आणखी सुरक्षित राहण्यास मदत करणार ठरणार आहे. अधिक माहितीसाठी ७७२२०२४४४४ / ९५९५८७७७७५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.”