पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशभक्त मनोभावे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतात शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु गणेश विसर्जनबाबत प्रशासनाने नेहमीच्या शहरातील नदीकाठावरील घाटावरील विसर्जनास कोरोनामुळे प्रतिबंध केलेला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनसाठी प्रभाग स्तरावर फिरत्या हौदाची सोय करा अशी मागणी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
“निवेदनात म्हणले आहे कि, घरातच गणपती बसवा व घरातच विसर्जन करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु हेच आवाहन आपण गणपती येण्याअगोदर पाच दिवस अगोदर केले असते तर नागरीकांनी कमी उंचीच्या व प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या न आणता शाडूच्या मूर्त्या आणल्या असत्या परंतु आता नागरीकांनी प्लॉस्टर ऑफ पँरीसच्या घरीच्या घरी विसर्जन होणार नाहीत, कारण त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मुर्तींची विटंबना होईल व नागरीकांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा नुमना पुन्हा एकदा समोर आलेला आहे.”
त्यामुळे पुढील पाच, सातक आणि नऊ दिवस व अनंत चर्तुथी या विसर्जन दिवशी शहरातील भक्तांच्या भावनांशी न खेळता गणेश विसर्जनांसाठी पुणे मनपाच्या धर्तीवर फिरत्या हौदाची संकल्पना प्रभाग स्तरावर राबविण्यात यावी. मुर्ती विरघळण्यासाठी आवश्यक असणारी सोडियम बायोकार्बोनेट पावडरसुध्दा उपलब्ध करुन द्यावी. त्याच प्रमाणे शहरातील सामाजिक संस्था गणेश मुर्तीचे दान स्वीकारतात त्यांना सुध्दा गणेश मुर्ती दान करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.