खेड | झुंज न्यूज : दारूच्या नशेत तरूणाने हॉटेलचा आचारी आणि व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा राग आल्याने हॉटेलच्या मूळ मालकाने आपल्या साथीदारासह मोटारीने तरूणाला धडक देत खाली पाडले. त्यानंतर तलवारीने वार करत त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (दि.९) रात्री अकरा वाजता वाकी येथे भाम नदीच्या पुलाजवळ घडली. याप्रकरणी दोनजणंना अटक करण्यात आली आहे.
हेमंत संतोश सुतार असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. हॉटेल मालक ऋतिक अतुल वहिले (वय २२, रा. वाकी खुर्द, ता. खेड), मयूर बाळासाहेब येवले (वय २०, रा. संुबरेनगर, वाकी खुर्द) यांना अटक करण्यात आली आहे. सूरज विठ्ठल वाळंुज (वय २८, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे यांनी याबाबत माहिती दिली.
सोमवारी (दि.९) हेमंत हा हॉटेलवर दारू पिण्यासाठी आला होता. दुपारी दोन वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तो दारू प्यायला. त्यानंतर दारूच्या नशेमध्ये त्याने हॉटेलच्या अचाऱ्यासोबत भांडणे केली. हॉटेलचा व्यवस्थापक धीरज भांडणे सोडविण्यासाठी आला असता हेमंतने त्यालाही मारहाण केली. त्यानंतर हा प्रकार हॉटेलचा मालक ऋतिक वहिले याला समजला. त्याने साथीदार मयूर याच्यासह हेमंत याचा शोध घेतला. ब्रिझा मोटारीतून ते हेमंतचा शोध घेत होते. रात्री अकरा वाजता हेमंत वाकी येथे भामा नदीच्या पुलाजवळून आपल्या दुचाकीवरून जाताना दिसला. आरोपींनी तलवार आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून हेमंतचा खून केला आणि सूरजच्या पायावरून मोटारीचे चाक घालून त्याला जखमी केले.
ही करवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचनेुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनील देवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे तसेच आदिनाथ नागणे, संजय घाडगे, हनुमंत कांबळे, मनोज साबळे, निखिल वर्पे, अशोक दिवटे, उध्दव गर्जे, प्रदीप राळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे करीत आहेत.