बोरगाव बु् | झुंज न्यूज : बोरगाव बु् येथे लसीकरण केंद्रावर जाऊन वयाच्या ९३ व्या वर्षी श्री सखाराम बापू फदाट ( मा सभापती पंचायत समिती जाफ्राबाद तथा माजी जिल्हा परिषद सदस्य) यांनी दुसऱ्या लसीचा डोस बोरगाव बु् येथे लसीकरण केंद्रावर जाऊन घेतला.
लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. त्यामुळे कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीमुळे कोरोनापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काहीही दुष्परिणाम नाही व मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नये, जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने लस टोचून घ्यावी, तसेच लसीकरण केंद्रावर जास्त गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवूनच लस घ्यावी.
जे तरुण मंडळी लस घेणार आहे अशा सर्व मंडळींना विनंती आवाहन की , लस घेतल्या नंतर आपण काही दिवस रक्तदान करु शकत नाही. त्याकरिता लस घ्यायच्या अगोदरच रक्तदान करून कोणाचे तरी जीव वाचवु शकतो का, याचा देखील विचार करण्याची गरज आहे.. आपल्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे आपण रक्तदान करावे जेणेकरून कोरोना काळात आपल्या हातुन समाजसेवा नक्कीच घडेल . लस घ्यायच्या अगोदर रक्तदान करावे.
प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करा व प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहनही श्री सखारामजी बापू फदाट (मा.सभापती पंचायत समिती जाफ्राबाद तथा माजी जिल्हा परिषद सदस्य औरंगाबाद) यांनी केले.
यावेळी उपस्थित ,आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी शिक्षक,आशा स्वंयसेविका , अंगणवाडी सेविका, उपस्थित होते.