मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मुदतवाढ मिळावी व अतिवृष्टीमुळे शेती पिकांबरोबरच शेतीच्या बांधाची तुटी फुटी ची नुकसान भरपाई मिळावी. शेती पिकांच्या पंचनाम्यात बरोबरच तुटी फुटी चे हि पंचनामे करण्यात यावे. तसेच मुळशी धरण भागातील वडगाव शिरगाव लिंबारवाडी वाघवाडी भीमनगर भादसखोंडा सुसाळे येथील शेत जमिनी टाटाच्या नावावर आहे. परंतु चार पिढ्यांपासून तेथील शेतकरी ती कसत आहे.
आज पर्यंत मागच्या काळात झालेल्या नुकसान भरपाई चे शेतकऱ्यांना कधीच पैसे मिळाले नाही. तरी यावेळी सदर गावांमध्ये अतिवृष्टीमुळे त्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे पंचनामे होऊन. शेत जमिन कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी मुळशी मावळ प्रांत संदेशजी शिर्के यांना करण्यात आली.
यावर मुळशी मावळ प्रांत संदेशजी शिर्के यांनी चार दिवसाची पंचनामे करता मुदतवाढ दिली आहे. तसेच शेत पिकाबरोबरच तुटी फुटी चे पंचनामे करावेत. तसेच टाटाच्या मालकीच्या सातबारा असणाऱ्या परंतु जी जमीन शेतकरी कसत आहेत. त्या सर्वांचे पंचनामे करावेत अशा प्रकारचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मा गटनेते शांताराम इंगवले, मा सभापती बाबा कंधारे, मा संचालक संत तुकाराम साखर कारखाना धैर्यशील ढमाले, महादेव मरगळे, बाळासाहेब उभे, मुळशी धरण विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाघ, सरपंच शंकर मरगळे, रासपचे मुळशीचे अध्यक्ष भाऊसाहेब आखाडे, शिवसेनेचे नेते दत्ता भाऊ गोरे, माऊली मरगळे, लक्ष्मण मरगळे उपस्थित होते.
📽️एकदा 🤩 बघाच…!
धुमाकूळ ! The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओ शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ _आता, “फुकटचा” 😈तोरा मिरवणाऱ्या “भुरट्या” शेठ लोकांचा…🤓 ‘जाळ’ अन् ‘धुर’ तर 🔥 निघणारच ना…ओsss शेठ !!आता, “फुकटचा” 😈तोरा मिरवणाऱ्या “भुरट्या” शेठ लोकांचा…🤓 ‘जाळ’ अन् ‘धुर’ तर 🔥 निघणारच ना…ओsss शेठ !!*_