उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण तसेच व्हीलचेयर व फळे वाटप
पिंपरी I झुंज न्यूज : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या वतीने दोन सुसज्ज रुग्णवाहिका लोकार्पण व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी व्हीलचेयर्सचे वाटप जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वायसीएम चे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, महाराष्ट्रातील एकमेव महिला रुग्णवाहिका चालक अनिता गोसावी व सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी यांचा विशेष सन्मान ना. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस जनसामान्यांना दिलासा देणारे उपक्रम राबवून साजरा केल्याबद्दल तसेच नुकताच द अमेरिकन युनिव्हर्सिटी यूएसए यांची मानाची ‘डॉक्टर ऑफ सोशल सायन्स’ ही पदवी मिळविल्याबद्दल ना. जयंत पाटील यांनी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत – धर यांचे अभिनंदन केले.
रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, वैशाली काळभोर, माई काटे, राजू बनसोडे, प्रज्ञा खानोलकर, राहुल भोसले, समीर मासुळकर, जगदीश शेट्टी, विनोद नढे, पंकज भालेकर, फजल शेख, मोहम्मद भाई पानसरे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, अमित भोसले, स्मिता कुलकर्णी, सविता नानेकर, मायला खत्री, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, शेखर काटे, अक्षय माछरे, संजय कुलकर्णी, ज्ञानेश्वर कांबळे, दीपक साकोरे, मनीषा गटकळ, दीपाली मुरकुटे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडकरांचा शब्द टाळू शकत नाही
यावेळी बोलताना ना. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविलेल्या शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
मागील वर्षी सांगलीला आलेल्या पुरपरिस्थितीत पिंपरी चिंचवडकरांनी सर्वात मोलाची मदत सांगलीवासीयांना केली आहे, त्यामुळे या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी नगरसेविका शिलवंत यांनी निमंत्रित केले असताना पिंपरी चिंचवडकरांचा शब्द मी टाळू शकलो नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सुलक्षणा शिलवंत – धर व अशोक सर्वांगीण विकास सोसायटी यांचे लोकोपयोगी कार्य नक्कीच उल्लेखनीय असून त्यांच्याकडून अधिकाधिक नागरिकांची सेवा घडावी अशा शब्दांत ना. जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत – धर जोपासत आहेत स्व. अशोक शिलवंत यांच्या समाजसेवेचा वारसा : संजोग वाघेरे
राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नगरसेवक संजोग वाघेरे यांनी यावेळी शहर राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्व. अशोक शिलवंत यांनी आयुष्यभर समाजासाठी दिलेले अविस्मरणीय योगदान मोलाचे आहे. त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत भक्कमपणे सांभाळत असून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मनापासून आनंद वाटतो, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
ना. जयंत पाटील यांचे आभार व्यक्त करताना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या राजकीय जीवनातील गुरुवर्य व मार्गदर्शकांची प्रत्यक्ष भेट झाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे. आपले मार्गदर्शन व मोलाचे पाठबळ असेच पाठीशी असू द्यावे अशी विनंती नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी केली.