पिंपरी I झुंज न्यूज : गेल्या वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पडणारे आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणत असणारे “मी अंगार भंगार नाय रे…” या धुमाकूळ घालणाऱ्या गाण्याच्या घवघवीत यशानंतर रत्नदीप कांबळे हे “रेक्स स्टुडिओ” च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले असून आषाढी एकादशी निमित्त “विठू माऊली…” हे हृदयस्पर्शी गाणे सर्वांच्या भेटीला घेऊन आले आहेत.
कोंडुन राहिला तु आबाळ या बाळाची
नाही पाहायला तु किती विणवु तुला र
ओढ तुझी लागली विठु माऊली माझी
विठु माऊली…
“विठु माऊली…” या गाण्याची निर्मिती रेक्स स्टुडिओ ने केली आहे. सौरभ साळुंके यांच्या मधुर आवाजातील काळजावर घाव घालणाऱ्या या हृदयस्पर्शी गाण्याचे लिखाण राहुल सूर्यवंशी यांनी केलेलं आहे. रत्नदीप कांबळे यांनी गाण्याला म्युजिक दिले आहे.
Arranging आणि Programming ऋषी व सौरभ देशपांडे यांचे आहे. Live Rhythm ऋत्विक तांबे यांचे आहे. Recordist अभिजीत समूर्त (Raisestrome Audiospace) हे आहेत. व्हिडीओ एडिट करण Vfx यांनी केला आहे. पोस्टर हार्दिक जाधव यांनी बनवले आहे. गाण्याचे प्रोमोशन पार्टनर महेश कापुरे आहेत.
🎬 Watch :