शिक्रापूर I झुंज न्यूज : बुरुंजवाडी गाव शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत वर्ग करा तसेच बुरुंजवाडी गाव एसटी स्टँड ते बुरुंजवाडी गावठाण उर्वरित रस्ता, बुरुंजवाडी गावठाण ते कोंढापुरी शिव रस्ता, आणि बुरुंजवाडी गावठाण ते चासकमान कॅनल रस्ता अशा एकूण तीन रस्त्यांचे काम मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. नुकतेच या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
सध्या बुरुंजवाडी हे गाव रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन हे गावापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बुरुंजवाडी गाव शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत वर्ग करण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावर गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी ही सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागतील असे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैया पाचुंदकर, बाजार समिती सभापती प्रकाश बापू पवार, मार्गदर्शक चेअरमन विजयजी टेमगिरे, बुरुंजवाडी गावच्या सरपंच कावेरीताई नळकांडे, उपसरपंच नानासाहेब रूके, माजी सरपंच सुशीलकुमार रुके, माजी सरपंच विलास नाना नळकांडे, डॉक्टर रवींद्र टेमगिरे, युवा नेते धनंजय काका रुके, रामदास नळकांडे, ग्रामपंचायत सदस्या पुनमताई रुके, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी नळकांडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.