तृतीय पंथी म्हणून आम्हाला सुद्धा अभिमानाने जगू द्या ! ; दीपिका पाटील यांचे भावनिक उद्गार
चिंचवड I झुंज न्यूज : समाजातील प्रत्येक घटक हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानुसार तृतीय पंथी यांना कोरोना महामारी कालावधीत भूख मारीचा सामना करावा लागू नये यासाठी ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस पुणे जिल्ह्याच्या वतीने व यशराज पारखी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फाऊंडेशन यांच्या वतीने ५० हजार रुपयांचे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी ऑल इंडीया प्रोफेशनल काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष यशराज पारखी तसेच करन थॉमस , जेनीन, जॅकोब, शशील पारखी व यशराज पारखी सोशल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
तृतीय पंथी दीपिका पाटील म्हणाल्या की,
“आम्हाला सुद्धा शिक्षण घेऊन समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा आहे. मी एक उत्तम नर्स आहे मेडिकल फिल्ड मध्ये सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मी काम केले. मला सर्व कामे येतात पण काम करत असताना माझ्या वर सतत जोक केले जात असे, मला चिडवले जात असे त्यामुळे मनोधैर्य खचते आणि त्यामुळे मी जॉब सोडला. आमची समाजा कडून फक्त एकच इच्छा आहे की जसे तुम्ही मुलगा मुलगी यांना स्वीकारले आहे तसेच तृतीय पंथी यांना देखील स्वीकारा, आम्हाला सन्मानाने जगू द्या ! आम्हाला सहानु भूती किंवा भीक नको आहे फक्त आदराने काम करण्याची संधी हवी आहे . कृपया आम्हाला आमचा हक्क द्या शिक्षणासाठी सवलत द्या. जशा प्रकारे मुलगा आणि मुलगी म्हणून अभिमानाने वागतात तसेच तृतीय पंथी म्हणून आम्हाला सुद्धा अभिमानाने जगू द्या !