पिंपरी I झुंज न्यूज : सध्या OTT आणि You Tube चॅनेल्स वर अनेक विविध मनोरंजनाचे विषय येतात त्यातच, “द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन” निर्मित “सोशल हसवणूक” हा प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा विनोदी कार्यक्रम You Tube वर सुरू झाला असून सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने कलाकारांच्या मेहनतीचे चीज झाले आहे.
केवळ विनोद निर्मितीच नव्हे तर मनोरंजनातून सामाजिक संदेशपर झलकही या कार्यक्रमात दिसून येत आहे. “द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन” निर्मित, सोशल हसवणूक या कार्यक्रमाला अंगणदीप फिल्म प्रोडक्शन ने प्रस्तुत केले आहे. विनय सोनवणे या कार्यक्रमाचे प्रोग्राम डायरेक्टर आहेत. तर महेश शिंदे, संभाजी बारबोले, सागर पळशीकर, राहुल समिंदर आणि विनय सोनवणे हे कलाकार आपले सदारीकर करीत आहेत.
या कार्यक्रमाचे एपिसोड लेखक म्हणून महेश शिंदे, राहुल समिंदर आणि विनय सोनवणे काम पाहता आहेत. तुषार नलवडे, सोमनाथ बोरगावे आणि द रायझिंग स्टार्स चे इतर सहकारी हे तांत्रिक कलाकार म्हणून काम पाहत आहेत. प्रेम झेंडे, प्रमोद साखरे, प्रसाद वडघुले, अमर चाकोटकर, राहुल राजे यांचं विशेष सहकार्य लाभले असून, कुबेरा विंग्स आणि संवाद ऑडिओ व्हिज्युअल्स मुख्य प्रायोजक आहेत. तर “झुंज न्यूज” मीडिया पार्टनर म्हणून आहे.
“सोशल हसवणूक” हा कॉमेडी कार्यक्रम आपल्याला दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता , “द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन” या युट्युब चॅनेलवर रिलीज होत आहे. प्रत्येक एपिसोड हा १० ते २० मिनिटांच्या आत असून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा आहे. सोशल हसवणूक या शिर्षकामध्ये समाज आणि हसू आशा एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे समाज आणि राजकारनात घडणाऱ्या घटनांचे विडंबन हेही आपल्याला पाहायला मिळेल असे प्रोग्राम डायरेक्टर आणि निर्माते विनय सोनवणे यांनी सांगितले.