हडपसर | झुंज न्यूज : कला परिवार हडपसर यांच्यावतीने व प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर तसेच डॉक्टर अश्विनी शेंडे यांच्या सौजन्याने कोंढवा येथील येवलेवाडी येथील पोतराज समाजाच्या ३० कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर, रामदास भाऊ तुपे, डॉ. अश्विनी शेंडे श्रुतिका चौधरी, योगेश गोंधळे, दिलीप मोरे, सतीश कालेकर, समीरा शेख, रेणू पुणेकर यांचे हस्ते अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोतराज समाजातील काही कलाकारांनी त्यांच्या व्यथा बोलून दाखवल्या.
प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, जेवढे शक्य होईल तेवढी पोतराज समाजाला वैयक्तिक मदत व शासनाकडून शक्य होईल तेवढी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न कला परिवार हडपसरच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू.
प्रमोद अय्या, काजल माने ,जयश्री चव्हाण, समाधान गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.